लोहगाव, विमाननगर, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर आणि सदाशिव पेठ परिसरातील रस्त्यांवर वाहनांना बंदी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
marathinews24.com
पुणे – Amit Shah Pune Visit Traffic Changes : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त रविवारी (दि १५ ) आणि सोमवारी (दि.१६) वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. ‘सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. वाहन चालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे’, असे आवाहन वाहतूक शाखेेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळ – सविस्तर बातमी
‘लोहगाव येथील हवाई दलाचा तळ ते विमाननगर रस्ता, रामवाडी ते भारत फोर्ज कंपनी, मुंढवा या रस्त्यावर रविवारी आणि सोमवारी सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क येथील नाॅर्थ मेन रोड, जहाँगीर हाॅस्पिटल चौक, अभियांत्रीकी महाविद्यालय चौक, नेहरु मेमोरिअल चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, टिळक रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), वेधशाळा चौक, संचेती चौक, पाटील इस्टेट, संगमवाडी ते येरवड्यातील शादलबाबा चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब रस्ता, ५०९ चौक ते लोहगाव येथील हवाई दलाचा तळ या रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे’, अशी माहिती पोलीस उपायुक्त भाजीभाकरे यांनी दिली.
अमित शहा यांचा सोमवारी (१६ नोव्हेंबर) सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने कार्यक्रम संपेपर्यंत सोमवारी सकाळी नऊनंतर टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही हाॅटेल, पेरुगेट पोलीस चैाकी ते पावन मारुती मंदिर, भरत नाट्य मंदिर परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. (Amit Shah Pune Visit Traffic Changes) सोमवारी सकाळी सातनंतर किराड चौक ते नेहरु मेमोरिअल हाॅल चौक मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांनी किराड चौक येथून जीपीओमार्गे हाॅटेल ब्ल्यू नाईल चौकात जावे. तेथून इच्छितस्थळी जावे.
पुणे जिल्हा परिषद परिसरातील दोराबजी माॅल ते हाॅटेल ब्ल्यू नाईल चौक हा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त एसजीएस माॅल, पूना क्लब, लेडीज क्लब, किराड चौक, पुणे पोलीस आयुक्तालय परिसरातील गल्ली, इस्काॅन मंदिर, ब्ल्यू नाईल चौक येथे वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलेे आहे.




















