गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाची कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त
marathinews24.com
पुणे – Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. प्रथमेश उर्फ दाद्या धनंजय जाधव (वय २६, रा. सोपाननगर, गल्ली क्रमांक ३, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खंडणी विरोधी पथक दोनमधील पोलीस कर्मचारी परिमंडळ सात परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी वडगाव शेरी भागातील सराईत जाधव याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस शिपाई गणेश खरात आणि अनिल कुसाळकर यांना मिळाली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणासाठी डॉ. थोरात दांपत्य देवदूतासारखे धावले – सविस्तर बातमी
पोलिसांनी सापळा लावून जाधव याला ताब्यात घेतले. (Pune Crime Branch News) त्याने घराशेजारी असलेल्या एका झुडपात पिशवी लपवून ठेवली होती. या पिशवीत त्याने पिस्तूल ठेवले होते. पोलिसांनी पिस्तूल आणि काडतूस जप्त केले. दहशत माजविण्यासाठी त्याने पिस्तूल बाळगल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, खरात, घावटे, कुसाळकर, वाघमारे यांनी ही कारवाई केली.




















