Breking News
Pune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवले

Pune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखी

Aundh Road Accident Pune

पुणे सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर येथील घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव मोटार रस्त्यात थांबलेल्या ट्रकवर आदळून मोटार चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात घडली. अपघातात मोटारीतील महिलेसह तिघे जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवाजी सखाराम होजगे (रा. सावंतवाडी, महागाव, ता. वडगाव मावळ, जि. पुणे) असे मृ्त्यमुखी पडलेल्या मोटार चालकाचे नाव आहे.

आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी

अपघातात मोटार चालक होजगे यांची पत्नी सुनंदा, मुलगा रोहित, राहुल हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित शिवाजी होजगे (वय २८) यांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी हाेजगे, त्यांची पत्नी सुनंदा, मुलगा रोहित, राहुल हे मोटारीतून पुणे-सोलापूर रस्त्याने २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास मोटारीतून निघाले होते. राजेंद्र पेट्रोल पंपाजवळ ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला ट्क थांबविला होता. ट्रक थांबविल्यानंतर चालकाने ट्रकचे दिवे लावले नव्हते. अंधारात भरधाव मोटारीने पाठीमागून ट्रकला धडक दिली. अपघातात मोटार चालक होजगे यांच्यासह त्यांची पत्नी, दोन मुले जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघात जखमी झालेल्या चौघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच मोटार चालक शिवाजी होजगे यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. अपघातास जबाबदार ठरणे, तसेच वाहतूक विषयक नियमांचे पालन न केल्या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाेराटे तपास करत आहेत.

२३ नोव्हेंबरला मध्यरात्री अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात भरधाव मोटार ट्रकवर आदळून मोटार चालक तरुणासह तिघांचा मृत्यू झाला होता. या अपघातात मोटारीतील दोघे जण गंभीर जखमी झाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×