Breking News
मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे गजाआडपुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छादट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यूमंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादतब्बल ५ महिलांनी घेतला-बांगड्या अन मेहंदीचा आनंदस्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुतेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वनपुणे शहरातील पाणीगळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी कृतीदल स्थापन करापार्टीत ड्रग्जचा पुरवठा करणार्‍यांचा शोध सुरूतीन मित्रांच्या भोवतीचा पौर्णिमेचा फेरा उलगडणार की अजून गुंता वाढणार, ‘पौर्णिमेचा फेरा सिझन २’ प्रदर्शित

पुण्यातील किडनी रॅकेटमध्ये ससूनमधील डाॅ. अजय तावरे सहआरोपी

पुणे किडनी रॅकेट प्रकरणात ससून रुग्णालयाच्या डॉक्टरवरही कारवाईची टांगती तलवार

marathinews24.com

पुणे – शहरातील रूबी हाॅल क्लिनीकमधील किडनी रॅकेट प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ससून रुग्णालयातील डाॅ. अजय तावरे हा संबंधित प्रकरणात गुंतलेला असून, त्याला याप्रकरणात सहआरोपी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी दिली.

पुणे पोलिस दलात दाखल होणार मोबाईल सर्वेलन्स व्हेईकल – सविस्तर बातमी

कल्याणीनगर अपघात प्रकरणात डाॅ. तावरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात डाॅ. तावरे न्यायालयीन कोठडीत असून, सध्या तो येरवडा कारागृहात आहे. किडनी रॅकेट प्रकरणात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली होती. निवृत्त न्यायाधीशांकडून चैाकशी करण्यात आली. तेव्हा डाॅ. तावरे या प्रकरणात सामील असल्याचे उघडकीस आले. आता डाॅ. तावरेला सहआरोपी करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

चौकशी समितीने याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. याप्रकरणात रूबी हाॅल क्लिनीकमधील वैद्यकीय तज्ज्ञ, किडनी दाता, दलाल, तसेच रुग्णाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये रुग्ण अमित अण्णासाहेब साळुंके, सुजाता अमित साळुंखे, दाता सारीका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंके, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवि गायकवाड, अभिजित मदने, रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेज ग्रँट, रेबेका जॉन (उप संचालक, रुबी हॉल), कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, डॉ.अभय सद्रे, डॉ. भूपत भाटी, डाॅ. .हिमेश गांधी, समन्वयक सुरेखा जोशी यांचा समावेश होता याबाबत आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डाॅ. संजोग सिताराम कदम यांनी फिर्याद दिली होती.

प्रकरण नेमके काय?

रुग्ण अमित साळुंके याची पत्नी सारिका ही त्याची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात यायची. किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर सारिकाने हिने तिच्या बहिणीकडे विचारणा केली. दलाल रवीभाऊने पैसे दिले का ? अशी विचारणा केली. त्यावेळी रवीभाऊने चार लाख रुपये देण्याचे मान्य केले होते, असे तिने तिला सांगितले. रवी भाऊने १५ लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र, चार लाख रुपये दिल्याचे उघड झाल्यानंतर याप्रकरणी सारिका साळुंके आणि तिच्या नातेवाईकांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.

पोलिसांनी याप्रकरणाचा तपास केला. तेव्हा किडनी रॅकेट उजेडात आले. किडनी रॅकेट प्रकरणात डाॅ. अजय तावरे याचे नाव समोर आले नव्हते. कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला. जुन्या गुन्ह्यांचा निपटारा करताना कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या किडनी रॅकेट प्रकरणाची कागदपत्रांची पाहणी केली. तेव्हा डाॅ. तावरे याने प्रकरणातून सुटण्यासाठी प्रयत्न केल्याचे आढळून आले. तेव्हा डाॅ. तावरेचा किडनी प्रत्यारोपण प्रकरणात सामील असल्याचे उघडकीस आला. तो प्रत्यारोपण विषयक काम करणाऱ्या समितीचा अध्यक्ष होता. समितीत ८ सदस्यांचा समावेश होता.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top