Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावणाऱ्याला बेड्या

तुळशीबागेत महिलेच्या पिशवीतून रोकड चोरणाऱ्या महिला गजाआड

खडकी परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील खडकी परिसरात ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. दिनेश अमृतलाल जैन (वय २४, रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पुण्यासह नाशिकमध्ये दागिने हिसकावणारी चोरट्यंची टोळी गजाआड – सविस्तर बातमी 

ज्येष्ठ महिला २८ मे रोजी खडकीतील एलफिस्टन रस्त्यावरून निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपी जैनने त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले होते. ज्येष्ठ महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी एलफिस्टन रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. तांत्रिक तपास, तसेच खबऱ्याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जैनला पकडले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस कर्मचारी सुधाकर राठोड, गालीब मुल्ला, संदेश निकाळजे, ऋषिकेश दिघे, प्रताप केदारी आणि पथकाने ही कामगिरी केली. जैन याने दागिने हिसकावण्याचे आणखी काही गुन्हे केले आहेत का? यादृष्टीने पोलिसांकडे तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×