प्रधानमंत्री धन-धान्य योजनेअंतर्गत १०० जिल्ह्यामध्ये सहभाग

बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कर्नाटक यांची घोषणा

marathinews24.com

पुणे – पंतप्रधान धन-धान्य योजना आगामी सहा वर्षे तब्बल १०० जिल्ह्यात राबविली जाणार आहे. त्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखांना सक्रिय सहभाग घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रजनिश कर्नाटक यांनी पत्रकार परिषदेत दिली. बँक राष्ट्रीयकरण दिवसाच्या निमित्ताने बँक ऑफ इंडिया संपूर्ण देशभर किसान दिवस साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने बँक ऑफ इंडिया, पुणे विभागीय कार्यालयाच्यावतीने १९ जुलैला खेड शिवापूर येथील नक्षत्र हॉलमध्ये विविध कार्यक्रम पार पडले.

गायन-वादन जुगलबंदीतून कलात्मक सृजनशील संवादाची अनुभूती – सविस्तर बातमी

नक्षत्र हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास ७०० हुन अधिक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमात बँकेकडून एकूण २५० कोटी रुपयांचे कृषी कर्जवाटप पुणे व सातारा जिल्ह्यातील शेतकरी आणि बचतगटांना रजनिश कर्नाटक यांच्या हस्ते वितरित केले. तसेच २२ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याचे पत्र वाटप करण्यात आले. यावेळी कृषी कर्ज लाभार्थ्यांना ए आय सक्षमी ड्रोन, ऊसतोडणी यंत्र, कंबाईन हार्वेस्टर आणि रेफ्रिजरेटेड व्हॅन्स यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर कृषी तंत्रज्ञान व अन्नप्रक्रिया उपकरणाचे प्रदर्शन आणि विषय तज्ज्ञशी शेतकऱ्यांचा थेट संवाद कार्यक्रम आयोजित केला होता.

प्रधानमंत्री धन-धान्य योजनेअंतर्गत १०० जिल्ह्यामध्ये सहभाग

बैंक ऑफ इंडियाच्या पुणे विभागाचे चिफ जनरल मॅनेजर प्रमोद कुमार द्विबेदी, पुणे विभागाचे झोनल मॅनेजर संजय कदम, मुख्य कार्यालयाचे जनरल मैनेजर (ग्रामीण विभाग) नकुला बेहरा व विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बँक ऑफ इंडियाच्या पुणे विभागाच्या फिल्ड जनरल मॅनेजर कार्यालयाने मार्च २०२६ पर्यंत १३ टक्के वार्षिक व्यावसायिक वाढीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुणे विभागात ९५ शाखा असून, त्यांच्यातर्फे आत्तापर्यंत ३७ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करण्यात आला आहे. पुण्यातील फिल्ड जनरल मॅनेजर ऑफिस अंतर्गत ६४४ शाखा कार्यरत आहेत. फिल्ड जनरल मॅनेजर ऑफिस अंतर्गत कृषी कर्जाचे प्रमाण ठरविलेल्या उद्दिष्टपेक्षा ३० टक्के जास्त आहे.

बँक ऑफ इंडियाचा ३१ मार्च २०२५ अखेर पर्यंत सर्व देशभरातील शाखामधून व्यवसाय १४ कोटी ८३ लाख कोटीवर गेला आहे. २०२४-२५ मध्ये बँकेने ९ हजार कोटी रुपयापेक्षा अधिक निव्वळ नफा कमावला आहे. बँकेच्या संपूर्ण देशभरात ५ हजार ३०० हुन अधिक शाखा आणि शाखामध्ये ५० हजारपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. बँक ऑफ इंडियातर्फे स्टार सखी योजना तसेच विविध कृषि विषयक योजना यशस्वीपणे राबवली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×