Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे गजाआड

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे गजाआड

११ दुचाकी जप्त

marathinews24.com

पुणे – मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे गजाआड – दुचाकी चोरणाऱ्या तरुणांना हडपसर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांकडून दोन बुलेटसह अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या. अमन उर्फ परश्या भोला तिवारी (वय १९, रा. माळवाडी, डीपी रस्ता, हडपसर ), मोहम्मद अशरफअली इम्तियाजअली अजमेरी (वय २०, रा. खराडी ), प्रणव गणेश जमादार (वय २०, रा. वडगाव शेरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी दाेन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. हडपसर परिसरातून दुचाकी चोरीला गेल्या होत्या.

घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद- वेगवेगळ्या घटनेत १९ लाखांचा ऐवज लांबविला – सविस्तर बातमी  

वाहन चोरीच्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. तिवारी, अजमेरी, जमादार आणि त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवीयनांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन बुलेटसह अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत १२ लाख ३० हजार रुपये आहे. आरोपींनी हडपसर, मुंढवा, बंडगार्डन, विमाननगर, तसेच शहराच्या मध्यभागातून दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे, अश्विनी जगताप, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस कर्मचारी अविनाश गोसावी, संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, बापू लोणकर यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×