Breking News
दारू पिण्याच्या वादातून मजुराच्या डोक्यात दगड घालून खून“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेखजिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

बारामतीत कीड रोग नियंत्रण प्रशिक्षण संपन्न

बारामतीत कीड रोग नियंत्रण प्रशिक्षण संपन्न

प्रशिक्षण कार्यशाळा तालुका फळ रोपवाटिका कन्हेरी येथे आयोजित

marathinews24.com

बारामती – उपविभागीय कृषी विभागामार्फत फळ पिकावरील पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प-क्रॉपसॅप व हॉर्टसॅपअंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा तालुका फळ रोपवाटिका कन्हेरी येथे आयोजित करण्यात आली. कार्यशाळेमध्ये सोयाबीन, मका, ऊस, तूर, भात, डाळिंब केळी, टोमॅटो व भेंडी या पिकावर आकस्मिक उद्भवणाऱ्या कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान व उत्पादनात होणारे घट लक्षात घेता प्रभावी कीड-रोग व्यवस्थापन, राष्ट्रीय कृषी विकास योजनाअंतर्गत पिकावरील कीड रोग नियंत्रण प्रकल्पाविषयी माहिती दिली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाची आढावा बैठक संपन्न – सविस्तर बातमी  

शारदानगर कृषी विज्ञान केंद्राचे विशेषतज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी सोयाबीन, भात, तुर, मका, ऊस डाळिंब, केळी, टोमॅटो व भेंडी या फळपिकावरील प्रमुख कीड-रोगांची ओळख व त्यावरील करावयाच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांचा जन्मदिन “शेतकरी दिन”म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, दौंडचे तालुका कृषी अधिकारी अजिंक्य दुधाने, इंदापूरचे तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, पुरंदर तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, उपकृषी अधिकारी प्रताप शिंदे, सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी राजेंद्र डोंबाळे तर आभार प्रदर्शन तंत्र अधिकारी रश्मी जोशी यांनी केले

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×