चक्क विमानाने पुण्यात येउन चोरी, आंतरराज्य टोळीला अटक

चक्क विमानाने पुण्यात येउन चोरी, आंतरराज्य टोळीला अटक

२५ लाखांचा ऐवज जप्त, अलंकार पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – विमानाने पुण्यात येउन चोरी करणार्‍या आंतरराज्य टोळीला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३५ बंडल केबल, ट्रक, चोरीसाठी लागणारे साहित्य मिळून तब्बल २५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. शफिक अहमद ( वय ४९ , रा. पुर्व दिल्ली) राजबुल (वय ३० रा. पश्चिम दिल्ली ) एम. डी . जीत (वय ४४ रा. बिहार) वारीस फकीर महंमद (वय ३५ रा. त्रिलोकपुरी दिल्ली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

८२ व्या वर्षी शेअर ट्रेडींगचे आमिष पडले ३० लाखांना – सविस्तर बातमी 

अलंकार हद्दीतील कर्वे पुतळ्यानजीक ५ लाखांची केबल चोरीची घटना २१ ते २२ जुलैला घडली होती. तांबे असलेली धातुची एक हजार फुट लांब केबल बीएसएनएल टेलिफोन कनेक्टसाठी वापरली जाणार होती. केबलची चोरी झाल्याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २ ऑगस्टला अलंकार पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दाखल गुन्हयातील संशयीत आरोपी हे मृत्युंजय मंदिर, कर्वेरोड कोथरुड याठिकाणी संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने वरिष्ठांना माहिती कळवून घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना पाहताच संशयितांनी हालचाली सुरू करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पळुन जात असताना पथकाने चोरट्यांना अत्यंत शिताफिने पकडुन चौकशी केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून ३५ बंडल केबल, ट्रक, चोरीसाठी लागणारे साहित्य मिळून तब्बल २५ लाखांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, एसीपी अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, पोलिस निरीक्षक अनिल माने, उपनिरीक्षक गणेश दिक्षीत, महेश निंबाळकर, धिरज पवार, सोमेश्वर यादव, तुषार सांळुके, माधुरी कुंभार, शिवाजी शिंदे, अंकुश लोंढे, साईनाथ पाटील, राकेश क्षिरसागर यांनी केली.

विमानाने दिल्लीतून पुण्यात येउन चोर्‍या

आरोपी शफिक अहमद, राजबुल, एम. डी . जीत, वारीस फकीर महंमद हे दिल्लीतून विमानाने प्रवास करून पुण्यात येत होते. त्यानंतर केबल चोरी करून विक्री केल्यानंतर पुन्हा माघारी जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बी.एस.एन.एल. टेलिफोन कंपनीच्या केबल चोरी करण्यासाठी टोळी परराज्यातुन विमानाने महाराष्ट्रात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×