प्रवासी महिलांकडील ३ लाखांचे दागिने चोरी

प्रवासी महिलांकडील ३ लाखांचे दागिने चोरी

चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल प्रवासी ज्येष्ठ महिलांकडील ३ लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. महापालिका भवन आणि हडपसर भागात या घटना घडल्या. याबाबत ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पथारीवाल्यांविरुद्ध कारवाईचा बडगा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला महापालिका भवन परिसरातील पीएमपी थांब्यावर थांबल्या होत्या. त्या आळंदी रस्त्यावर राहायला आहेत. बसमध्ये प्रवेश करताना गर्दीत चोरट्याने कटरचा वापर करुन त्यांच्या हातातील एक लाख रुपयांची सोन्याची बांगडी लांबविली. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी हिरे तपास करत आहेत.

हडपसर भागातील थांब्यावर पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून दहा हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा दोन लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. तक्रारदार महिला मूळच्या सोलापूरच्या आहेत. त्या हडपसर भागातील रवीदर्शन थांब्यावर थांबल्या होत्या. बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी गर्दीत त्यांच्या पिशवीतून रोकड आणि दागिने लांबविले. पोलीस कर्मचारी गिरे तपास करत आहेत.

विश्रंतवाडीत तरुणाचा मोबाइल हिसकाविला

विश्रांतवाडी परिसरात पादचारी तरुणाच्या हातातील ८५ हजार रुपयांचा मोबाइल संच दुचाकीस्वरा चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पादचारी तरुण टिंगरेनगर भागातील गल्ली क्रमांक १३ मधून निघाला होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाच्या हातातील महागडा मोबाइल हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक पाडेकर तपास करत आाहेत.

मोबाइल विक्री दुकानात चोरी

मोबाइल विक्री दुकानाचा दरवाजा उतकटून चोरट्यांनी मोबाइल, तसेच अन्य साहित्य असा एक लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना लोणीकंद भागात घडली.

याबाबत व्यावसायिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई रस्त्यावर मोबाइल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून जुने आणि नवीन मोबाइल संच, अन्य साहित्य असा मुद्देमाल लांबविला. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन थेरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×