Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पुण्यात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

पुण्यात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

पुण्यात वेगवेगळ्या घटनेत महिलांकडील तीन लाख ४० हजारांचे दागिने हिसकावले 

marathinews24.com

पुणे – शहरात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. बिबवेवाडी, ओैंध,येरवडा, हडपसर भागात पादचारी महिलांचे दागिने हिसकावल्याची घटना घडली. दुचाकीस्वार चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत पादचारी महिलांकडील तीन लाख ४० हजारांचे दागिने हिसकावून नेले.

नगर रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी 

बिबवेवाडी-अप्पर इंदिरानगर भागातील व्ही.आय. टी. स्कूलच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पादचारी महिलेच्या गळ्यातील ३० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला या बिबवेवाडीतील महेश सोसायटीत राहायला आहेत. त्या सायंकाळी पावणेपाचच्या सुमराास व्ही. आय. टी. स्कूलच्या प्रवेशद्वारासमोर निघाल्या हाेत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.

ओैंधमधील गायकवाडनगर भागात शनिवारी (२३ ऑगस्ट ) रात्री नऊच्या सुमारास पादचारी महिलेच्या गळ्यातील एक लाख दहा हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला ओैंधमधील गायकवाडनगर भागात राहायला आहेत. त्या शनिवारी रात्री गायकवाडनगर परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वरा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक तोटे तपास करत आहेत.

येरवडा भागात एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत ज्येष्ठ महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला २० ऑगस्ट रोजी येरवडा भागातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस हवालदार मोरे तपास करत आहेत.

हडपसरमधील गोंधळेनगर परिसरात पादचारी महिलेकडील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला गोंधळेनगर परिसरातून शनिवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी निघाल्या होत्या. त्या वेळी शिवमंदिराजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. महिलेने मंगळसूत्र घट्ट धरून ठेवले आणि चोरट्यांना प्रतिकार केला. मंगळसूत्राचा अर्धवट तुटलेला भाग हिसकावून चोरटे पसार झाले. तुटलेल्या मंगळसूत्राच्या अर्धवट भागाची किंमत एक लाख रुपये असल्याचे महिलेने फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक मांडवे तपास करत आहेत.

विद्यार्थ्याचा मोबाइल हिसकाविला

शनिवार पेठेत एका विद्यार्थ्याचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका विद्यार्थ्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार विद्यार्थी शनिवार पेठेतील आपटे घाट परिसरातील एका वसतिगृहात राहायला आहे. तो शनिवारी रात्री आपटे घाट परिसरातून निघाला होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्याकडील २५ हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×