Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

नगर रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

मद्यधुंद कार चालकाने डिलिव्हरी बॉयला चिरडले

नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातील घटना 

marathinews24.com

पुणे – भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज कांबळे असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे आजोबा विश्वदीप विठ्ठल कांबळे (रा. प्रियंकानगरी, उबाळेनगर, वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी, २ कोटीची उलटी जप्त – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज कांबळे हा २३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातून निघाला होता. त्या वेळी भरधाव दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या कांबळे याला धडक दिली. अपघातानंतर दुचाकीस्वार भरधाव वेगात पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सूरजचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्यात येत असून, पोलीस हवालदार गोंग तपास करत आहेत. नगर रस्त्यावरील वाघोली ते लोणीकंद परिसरात गंभीर स्वरुपाच्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. आठवड्यापूर्वी लोणीकंद भागात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×