व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी, २ कोटीची उलटी जप्त

व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी, २ कोटीची उलटी जप्त

पुणे वन-विभागाची कारवाई

marathinews24.com

पुणे – बेकादेशिररित्या व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी प्रकणात पुणे वन विभागाने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून दोन किलो व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन कोटी रूपये आहे. दि. २१ ऑगस्टला वन विभागाला व्हेल माशाची तस्करी करणारे हे कोथरूड चांदणी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली.

ज्ञानाची शक्ती ओळखून प्रगतीचा मार्ग शोधला पाहिजे- अरुण फिरोदिया – सविस्तर बातमी 

वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, विभागीय वनअधिकारी अमोल थोरा यांंच्या मार्गदर्शनाखाली पुणे वनविभागाचे वनसंरक्षक विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले, वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांच्या पथकाने चांदणी चौकात चार संशयीतांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून दोन किलो व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली. इनोव्हा कारमधून ही उलटी जप्त करण्यात आली. कारवाई दरम्यान एक आरोपी फरार झाला. याप्रकरणात स्पर्म व्हेल माशाची उलटी बाळगल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
स्पर्म व्हेल माशाची उलटीचा उपयोग प्रामुख्याने महागड्या परफ्युमध्ये केला जातो. जास्त काळ टिकणार सुगंध तयार करण्यासाठी याचा वापर होतो.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×