मॅट न्यायाधिकरणाचा पुणे पोलिसांना दणका

मॅट न्यायाधिकरणाचा पुणे पोलिसांना दणका

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिला अधिकाऱ्याची बदली रद्द

marathinews24.com

पुणे – राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या महिलेच्या विनयभंगाची घटना घडली होती. याप्रकरणी संबंधिताविरुद्ध त्यांनी धाडसाने गुन्हा दाखल केला. परंतु त्यानंतर काही दिवसांतच पोलीस प्रशासनाने त्यांची बदलीचा आदेश काढला. मात्र, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट ) बदलीचा आदेश मनमानी, दंडात्मक व द्वेषातून केलेला असल्याचे सांगत तो रद्द केला आहे. उपाध्यक्ष एम. ए. लोवकर यांच्या न्यायाधिकरनाने पुणे पोलिसांना दणका दिला आहे.

पुण्यात गणशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २६ सराईत तडीपार; परिमंडळ चारच्या हद्दीतील गुंडांविरूद्ध कारवाई – सविस्तर बातमी 

बंदोबस्ताच्या ड्यूटीवर असताना संबंधित महिला अधिकाऱ्याचा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने जून २०२५ मध्ये विनयभंग केला होता. दुसऱ्याच दिवशी त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणानंतर वरिष्ठांनी महिला अधिकाऱ्याला गणेशोत्सव व निवडणुकीच्या काळात अपमान टाळण्यासाठी बदली घ्यावी असा सल्ला दिला. मात्र, महिला अधिकाऱ्यांनी नकार दिला आणि “अशी बदली महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा मनोबल खच्ची करेल” असे ठामपणे सांगितले.

संबंधित महिला अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतरही २१ जुलै २०२५ रोजी आदेश काढून त्यांची बदली विश्रामबाग पोलीस ठाण्यातून वाहतूक शाखेत करण्यात आली. हा आदेश शिस्तभंग व प्रशासकीय कारणे या नावाखाली काढला गेला. पण न्यायाधिकरणात बदलीसाठी आधारभूत ठरवलेला “डिफॉल्ट रिपोर्ट” मागील तारखेला दाखल केला होता. त्यातील माहितीही विसंगत होती हे स्पष्ट झाले.

न्यायाधिकरनाचे निरीक्षण

महिला अधिकाऱ्याची कारकीर्द निर्दोष असून त्यांना अनेक पुरस्कार व प्रशस्तिपत्रे मिळाली आहेत. डिफॉल्ट रिपोर्टवरील तारखांमध्ये विसंगती असून तो बनावट व अविश्वसनीय आहे. २४ जूनला गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच बदली झाली. यावरून बदली द्वेषातून प्रेरित व दंडात्मक असल्याचे दिसते. आदेशाला प्रशासकीय कारणे असा मुखवटा देण्यात आला; प्रत्यक्षात हा मनमानी निर्णय आहे. असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले.

राजकीय दबावाखाली महिला अधिकाऱ्यांना दडपण्याचे प्रयत्न न्यायालय मान्य करणार नाही. गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदली किंवा शिक्षा देणे म्हणजे अपमान आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर घाव घालणारी कोणतीही कारवाई स्वीकारली जाणार नाही. असा ठोस संदेश पोलिस प्रशासनाला न्यायाधिकरनाने दिला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×