पादचारी जेष्ठेचे पावणेदोन लाखांचे गंठण हिसकावले

पादचारी जेष्ठेचे पावणेदोन लाखांचे गंठण हिसकावले

आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रस्त्याने पायी घरी चाललेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी तिच्या गळ्यातील १ लाख ७५ हजार रूपयांचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. ही घटना ११ फेबु्रवारीला रात्री साडेआठच्या सुमारास आंबेगावमधील गीताकुंश बंगल्यासमोर घडली आहे. याप्रकरणी ६२ वर्षीय महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यावसायिकाची १ कोटी १५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला आंबेगावमध्ये राहायला असून, ११ फेबु्रवारीला रात्री साडेआठच्या सुमारास गीताकुंश बंगल्याजवळून पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने महिलेच्या गळ्यातील पावणेदोन लाखांचे सोन्याच गंठण हिसकावले. महिलेने आरडा-ओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे सुसाट पसार झाले. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या दुचाकीचा क्रमांक शोधून माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×