Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

व्यावसायिकाची १ कोटी १५ लाखांची फसवणूक

व्यावसायिकाची १ कोटी १५ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी केली फसवणूक

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका लाॅंड्री व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी १ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत लाँड्री व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सानिया गोखले असे नाव सांगून फसवणूक करणारी महिला, तसेच विविध बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक नियमभंगाचे बनावट चलन पाठवून फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४८ वर्षीय लाँड्री व्यावसायिक पर्वती गावातील लक्ष्मीनगर भागात राहायला आहेत. त्यांचा लाँड्री व्यवसाय आहे. गेल्या वर्षी सानिया गोखले असे नाव सांगणाऱ्या महिलेने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यांना शेअर बाजारातील विविध गुंतवणूक योजनांची माहिती देऊन समाज माध्यमातील एका समुहात सहभागी करुन घेतले.

गेल्या चार ते पाच महिन्यात लाँड्री व्यावसायिकाने वेगवेगळ्या बँक खात्यात एक कोटी १५ लाख ११ हजार ६०० रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा मिळाल्याचे भासविण्यात आले. तसा संदेशही पाठविण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर लाँड्री व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×