वाहतूक नियमभंगाचे बनावट चलन पाठवून फसवणूक

वाहतूक नियमभंगाचे बनावट चलन पाठवून फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) वाहतूक नियमभंग करण्यात आल्याचे बनावट चलन पाठवून एकाची दोन लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४८ वर्षीय तक्रारदाराने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यात – सविस्तर बातमी 

तक्रारदार व्यावसायिक मार्केट यार्डातील गंगाधाम परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना वाहतूक नियमभंगाचे बनावट चलन एपीके फाईलच्या माध्यमातून पाठविले. या बनावट चलनावर आरटीओचा उल्लेख असल्याने व्यावसायिकाने संबंधित फाईल उघडली. सुरुवातीला चोरट्यांनी त्यांना छोटी रक्कम पाठविण्यास सांगितले. त्यानंतर बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन चोरट्यांनी व्यावसायिकाच्या बँक खात्यातून दोन लाख ९५ हजार रुपयांची रोकड लांबविली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवले तपास करत आहेत. वाहतूक नियमभंगाचे बनावट चलन, थकीत वीज देयक, गॅस देयक पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×