Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यात

पुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यात

अल्पवयीन मुलींची सुटका, चरस, ड्रग्जचे इंजेक्शन जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठेत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह परिमंडळ एकने बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोबिंग ऑपरेशन राबवले. त्यावेळी कुंटणखान्यातून दोन बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, चार बांग्लादेशी अल्पवयीन मुलींचीही सुटका केली आहे. त्याठिकाणी नशेची इंजेक्शन, ७ ग्रॅम चरस जप्त केले आहे.एकाच वेळी तब्बल ४१ इमारतीत ७०० पेक्षा जास्त नागरिकांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख उपस्थित होते.

धक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळले – सविस्तर बातमी 

कायदा सुव्यवस्थेसह गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांविरूद्ध कारवाईच्या अनुषंगाने बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. प्रामुख्याने कुंटणखान्यात बेकायदेशीररित्या काही बांग्लादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याचपार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बांग्लादेशींविरूद्ध कारवाईचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ एसीपी, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तब्बल ६०० पोलीस अमलदारांचा फौजफाटा कारवाईत सहभागी झाला होता. मध्यरात्री बारा वाजेनंतर पहाटे चारपर्यंत बुधवार पेठेतील प्रत्येक इमारत, गल्ली-बोळात पायी पेट्रोलिंग करीत ७०० जणांची कसून विचारपूस करीत झाडाझडती घेतली.

बांग्लादेशी महिला ताब्यात, अल्पवयीन मुलींची सुटका

कारवाईवेळी दोन बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरूद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबतच काही अल्पवयीन मुलींचीही सुटका केली आहे. त्यांना पुण्यात कोणी आणले, वेश्या व्यवसाय करण्यास कोणी प्रवृत्त केले, याची चौकशी केली जात आहे. दरम्यान, ७ ग्रॅम चरस, नशेचे इंजेक्शन जप्त केले असून, त्यासंदर्भात ड्रग्ज पेडलरांकडेही तपास केला जाणार आहे. दरम्यान, काही वर्षांत पहिल्यांदाच एकाचवेळी चहूबाजूंनी बॅरिकेटस लाउन बुधवार पेठ परिसरात बंद केला होता. त्यानुसार परिसरात आलेल्या आंबट शौकिनांसह कुंटण खान्यातील सर्वाची चौकशी करण्यात आली.

आंबटशौकिनांवर गयावया करण्याची वेळ

पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन राबवून धरपकड केली. त्यावेळी बहुतांश तरूणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात रस्त्यावर बसवण्यात आले. त्यानंतर संबंधितांची छायाचित्रे काढून व्हिडिओग्राफी करण्यात आली. तेव्हा संबंधित तरूणांनी आमचे फोटो काढू नका, व्हिडिओ व्हायरल करू नका, आमच्या कुटूंबियांना खूप वेदना होतील, अशाप्रकारे पोलिसांना गयावया केली. पोलिसांनी सर्वांची नावे नोंदवून त्यांना सोडून दिले.

पुण्यात बांग्लादेशींविरूद्ध मोहिम हाती घेण्यात आली असून, त्याचअनुषंगाने गुन्हे शाखेसह परिमंडळ एकमधील अधिकारी कर्मचार्‍यांनी बुधवार पेठेत कोंबिंग ऑपरेशन राबवले आहे. कारवाईदरम्यान ६०० हून अधिकांची तपासणी केली. काही बांग्लादेशी महिला, मुलींनाही ताब्यात घेतले असून, चौकशी केली जात आहे.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×