Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

धक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळले

धक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळले

दारूमुळे भांडण झाल्यानंतर मुलाचे कृत्य; पुण्यातील दांडेकर पुल येथील घटना

marathinews24.com

पुणे – दारूचे व्यसन असलेल्या मुलाने वडिलांशी वादविवाद केल्यानंतर दोघात भांडण झाले. त्यानंतर नशेत मुलाने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील दांडेकर पुल परिसरात घडला. याघटनेत वडिलांचा उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविंद्र भालेराव (वय ६१, रा. स.नं. १३०, दांडेकर पुल) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सागर रविंद्र भालेराव (वय २७, रा. दांडेकर पुल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यात – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, रविंद्र भालेराव हे सुतार काम करत होते. त्यांचा मुलगा सागर देखील त्यांच्यासोबतच सुतार काम करत असत. सागरला दारूचे व्यसन होते. तो सतत दारू प्यायचा. तो अविवाहित असून, दांडेकर पुल परिसरात कुटूंबासह हे दोघेही राहत होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात (दि. ७ फेब्रुवारी) सायंकाळी सागर दारू पिल्याने त्यांच्यात वादविवाद झाले. वाद कटाक्याचे झाल्यानंतर रागाच्या भरात सागरने गाडीतील पेट्रोल काढले. वडिलांच्या अंगावर टाकले. पेट्रोल टाकल्यानंतर काडीपेटीने त्यांना पेटवून दिले. पेट्रोलमुळे अचानक भडका उडाला. वडिल रविंद्र हे आगीत होरपळले. नागरिकांनी त्यांच्यावर पाणी टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात ते ४५ ते ५० टक्के भाजले गेले. त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी मुलगा सागर याच्यावर खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुभाष महाले हे करत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×