Breking News
नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड पी. व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटकसंजय दराडे पुण्याचे नवे सह पोलिस आयुक्तयुट्यूब पाहून बनवला बॉम्ब; आरोपीला नागपूरमधून अटकपुण्यात २० मे रोजी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना शिबिर‘ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारपुणे जिल्हा नियोजन बैठकीत अवकाळी पाऊस, वाहतूक कोंडीची चर्चाखरीपासाठी खते-बियाण्यांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करा; बोगस निविष्ठांविरोधात कारवाई कराशिवसेना पुणे जिल्हाप्रमुखपदी रामदास धनवटे यांची नियुक्तीकिल्ले पुरंदरावर “जयतु शंभू” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पात्र उमेदवारांना प्रमाणपत्रे प्राप्त करून घेण्याचे आवाहन

सफाई कर्मचाऱ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांचा डाटाबेस तयार करावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

वयोगट आणि शिक्षणाानुसार डाटाबेस तयार करण्यासाठी दिले निर्देश

marathinews24.com

पुणे – सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांची उन्नती व्हावी यासाठी त्यांचा वयोगट, शिक्षण यानुसार यादी (डाटाबेस) तयार करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी – सविस्तर बातमी

सफाई कामगारांच्या विविध अडचणी व प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसार खैरनार, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ए. आर. गुजर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, पुणे मनपाचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लापा जाधव, बै.जी. वैद्यकीय महाविद्यालयाचे श्वसनोपचार विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय गायकवाड यांच्यासह पुणे, खडकी छावणी मंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगरपालिका, पिंपरी महानगरपालिकांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

सफाई कामगार आणि त्यांच्या पाल्यांच्या कल्याणासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी त्यांची निश्चित आकडेवारी असणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व रुग्णालये, नगरपालिका, महसूल कार्यालये आदी ठिकाणच्या सफाई कामगारांचे सर्वेक्षण करावे. या समाजातील तरुण पिढीला शिक्षणासाठी, युवा पिढीला विश्वकर्मा योजनेतून रोजगार आणि उर्वरितांना अन्य सामाजिक व आर्थिक सुरक्षा योजनांचा लाभ कसा देता येईल याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

ससून रुग्णालयातील सफाई कामगारांच्या वारसांच्या अनुकंपा भरतीविषयक प्रकरणे आदींवर कार्यवाही गतीने व्हावी यासाठी पुढील आढवड्यात बैठक घ्यावी. ४८ बदली कामगारांचे भरतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. सफाई कामगारांचे वेतन त्यांना रोख हातात न देता त्यांच्या बँक खात्यावर दरमहा ५ तारखेच्या आत जमा करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारांना द्याव्यात. तसेच तसे झाल्याबाबत दरमहा १५ तारखेपर्यंत बँक स्टेटमेंट मागवून खात्री करावी, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत विविध स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधींनी सफाई कामगारांचे प्रश्न मांडले. त्यावर सकारात्मक राहून अधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×