Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला मुकलो…

व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला मुकलो...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ डॉ माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली

marathinews24.com

मुंबई – पर्यावरण संतुलनाच्या क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारे डॉ. माधव गाडगीळ व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ म्हणून सदैव स्मरणात राहतील, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मभूषण डॉ माधव गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची, लोकसहभागाची जोड देणारे समर्पित व्यक्तिमत्व हरपले – सविस्तर बातमी 

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, डॉ गाडगीळ यांनी पर्यावरणविषयक जाणिव जागृती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले. पश्चिम घाटांमधील जैवविविधतेबाबतच्या संवेदना जिवंत ठेवणं आणि त्या प्रगल्भ करणे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. डॉ गाडगीळ यांच्या योगदानाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने त्यांना २०२४ मध्ये यूएनईपीच्या ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्काराने सन्मानित केले होते. सहा दशकांच्या वैज्ञानिक कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषविली. मात्र त्यांनी स्वतला ‘जनतेचा वैज्ञानिक’च मानलं.

पर्यावरण क्षेत्रातील कार्याने महाराष्ट्र सुपुत्र डॉ. गाडगीळ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली. या अर्थाने त्यांची पर्यावरण जतन, संवर्धन क्षेत्राला उणीव भासत राहील. त्यांच्या निधनामुळे एका ऋषीतुल्य मार्गदर्शकाला आपण मुकलो असून गाडगीळ कुटुंबीयांवर दुःखाचा आघात झाला आहे. त्यांच्यासह गाडगीळ यांचे चाहते, त्यांचे संशोधक विद्यार्थी यांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री  फडणवीस यांनी म्हटले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×