Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची, लोकसहभागाची जोड देणारे समर्पित व्यक्तिमत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार

पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची, लोकसहभागाची जोड देणारे समर्पित व्यक्तिमत्व हरपले

ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

marathinews24.com

मुंबई – ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांच्या निधनामुळे पर्यावरण संरक्षण चळवळीची मोठी हानी झाली असून पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची, लोकसहभागाची जोड देणारे समर्पित व्यक्तिमत्व हरपले, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत डॉ. गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक शिक्षणाकरिता सामूहिक बांधिलकी महत्त्वाची- सचिव तुकाराम मुंढे – सविस्तर बातमी 

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की,विकास आणि पर्यावरण यांचा समतोल कसा साधावा, याचा वस्तुपाठ डॉ. गाडगीळ यांनी घालून दिला होता. निसर्ग हा केवळ पाहण्याची वस्तू नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा आधार आहे असे त्यांचे म्हणणे होते. पर्यावरणविषयक सार्वजनिक धोरणांवर त्यांचा मोठा प्रभाव होता. ते शाश्वत विकासाचे खंदे पुरस्कर्ते होते.पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांनी पारंपरिक ज्ञान प्रणालींना आधुनिक विज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पर्यावरण संरक्षणात लोकांचा सहभाग घेण्यात त्यांना यश मिळाले.निसर्ग वाचवायचा असेल तर तिथल्या स्थानिक माणसाला सोबत घेतले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. जल, जंगल आणि जमीन यावर स्थानिक लोकांचा अधिकार असावा,असे ते मानत.​खाणकाम, मोठी बांधकामे आणि जलवायू बदल यांसारख्या धोक्यांविरुद्ध लढणारा एक प्रमुख आवाज हरवला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×