Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य पदयात्रा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य पदयात्रा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

शिवजयंती दिनानिमित्त ‘मेरा युवा भारत” भव्य पदयात्रेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन

पुणे – भारत सरकारचे युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयाने शिवजयंती दिनानिमित्त ‘मेरा युवा भारत” भव्य पदयात्रेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून पदयात्रेचा शनिवार वाडा येथून शुभारंभ करण्यात आला.

शिवजयंतीच्या पर्वावर महसूलमंत्र्यांची महत्वाकांक्षी घोषणा; एका दिवसात निकाली काढणार पंधरा महसूल सेवा – सविस्तर बातमी 

यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिक्षण उपायुक्त वसुंधरा बारवे, मनपा उपायुक्त संदीप खलाटे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार स्मिता माने,अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार, भारतीय खो खो संघाचे कर्णधार प्रतीक वायकर तसेच शिक्षण, पर्यटन, क्रीडा, आरोग्य व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महापौर नागपुरे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण अंगीकारले पाहिजेत. शिवजयंती ही औपचारिक मिरवणूक न राहता ती तरुण पिढीला महाराजांच्या विचारांशी जोडणारी, सगळ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करणारी ठरावी. आपले सण- परंपरा सर्वांनी एकत्र येऊन साजरे केले पाहिजेत. सर्व महानुभाव, युगपुरुषांच्या जयंती एकत्र येऊन साजरे करुया सर्वांमध्ये सांघिक भावना निर्माण होऊन शिवरायांचे विचार आचरणात यावेत, असा संकल्प यानिमित्ताने करुया, असे त्या म्हणाल्या.

युवा पिढीने थोरा मोठ्यांचा वारसा जतन करावा, तरुण पिढीमध्ये ऊर्जा नवसंकल्पना जागृत करण्याच्या उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे लकडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

या पदयात्रेचा शनिवार वाडा येथून शुभारंभ होऊन एस एस पी एम शाळेजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

पदयात्रेत पारंपरिक वेशभूषेत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सुमारे २ हजार विद्यार्थी- विद्यार्थीनी सहभाग घेतला.

यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×