Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड

भांडणात मध्यस्थी अंगलट, तरूणावर वार

भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – दहशत माजविण्यासाठी देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. सराइताकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले. अभिषेक कैलास दांगट (वय १९, रा. वृंदावन विश्व सोसायटी, नऱ्हे रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दांगट याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पतंग उडविताना तोल जाऊन पडल्याने १२ वर्षांच्या मृत्यू – सविस्तर बातमी 

भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक गुरुवारी (८ जानेवारी) भारती विद्यापीठ परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी राजमाता उद्यानाजवळ एक जण पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी मितेश चोरमले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दांगट याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले. चौकशीत त्याने दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची कबुली दिली.पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, अण्णा दराडे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×