Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड

दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड

पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पर्वती पोलिसांनी केली अटक 

marathinews24.com

पुणे – दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पर्वती पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. शुभम दिलीप पवार (वय १९, रा. अरण्येश्वर, सहकारनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. २१ ऑगस्ट रोजी पर्वती पोलिसांकडून गस्त घालण्यात येत होती. त्या वेळी पवारकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी महेश मंडलिक यांना मिळाली.

पुण्यात सायबर चोरट्यांकडून ६७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी सापळा लावून पवारला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. पवार याच्याकडून पिस्तुलासह एक काडतूस जप्त करण्यात आले. पवार याने दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची माहिती मिळाली आहे. त्याने पिस्तूल कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सद्दाम शेख, मनोज बनसोड, सूर्या जाधव, श्रीकांत शिंदे, अमोल दबडे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×