Breking News
Pune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवले

चेहऱ्यावरील हास्य ही देवाची सर्वांत मोठी कलाकृती – ब्रम्हर्षी गुरुदेव

चेहऱ्यावरील हास्य ही देवाची सर्वांत मोठी कलाकृती - ब्रम्हर्षी गुरुदेव

ब्रम्हर्षी गुरुदेवांचे जीवनमूल्यांवर मार्गदर्शन

marathinews24.com

पुणे – जीवनात रहस्य नसेल तर जीवनाला अर्थ नाही. प्रश्नांसोबत जगत राहिलो तर जीवन कधी संपले हेच कळणार नाही. जीवन जगताना अडचणी तर येणारच पण याच अडचणीच तुमची शक्ती वाढवतात. तसेच माणसाच्या चेहऱ्यावरील हास्य ही देवाची सर्वांत मोठी कलाकृती आहे,” असे प्रतिपादन सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रम्हर्षी गुरुदेव यांनी केले.विश्व धर्म चेतना मंच, , पीसीएमसी परिवार यांच्यावतीने आयोजित ‘सिद्धि साधना का महाआशीर्वाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

मराठी साहित्य आणि प्रकाशन व्यवसायात उत्थानाची गरज- भारत सासणे – सविस्तर बातमी 

तब्बल ६८ दिवसांच्या अग्नि महासाधने नंतर ब्रम्हर्षी गुरुदेवांनी उपस्थित भक्तांना जीवनमूल्यांची सखोल शिकवण दिली. यावेळी मंचचे राज्याध्यक्ष उत्तम बाठीया, आयोजक सुमित चंगेडीया,प्रायोजक महावीर बाठीया, प्रितेश कटारिया, संतोष लगडे, राहुल बोगावत, स्वप्निल गांधी, भावेश चोरड़िया उपस्थित होते.

कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास ही बाब चिंताजनक असल्याचे सांगत ब्रम्हर्षी गुरुदेव म्हणाले, तंत्रज्ञानामुळे कौटुंबिक संवाद कमी होत असून कौटुंबिक मूल्ये हरवत चालली आहेत. घरातील संवाद वाढवा. रागासोबत प्रेमही व्यक्त करा. चेहऱ्यावरचे हास्य ही देवाची सर्वोत्तम कलाकृती आहे. ते कायम ठेवा आणि आनंदाने जीवन जगा.

जीवनातील भेदभाव फोल असल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले, “मुंगी आणि हत्तीची तुलना होऊ शकत नाही. मातीत मिसळलेली साखर वेगळी करणे मुंगीला जमते, हत्तीला नाही. प्रत्येक जीवन वेगळे, रहस्यांनी भरलेले आहे. ते रहस्यच जीवनाला अर्थ देते. सुखाच्या मागे धावू नका; जे आहे त्यात आनंद शोधा. कार्यक्रमाच्या शेवटी मोठ्या संख्येने उपस्थित अनुयायांनी गुरुदेवांचे आशीर्वचन ऐकून आध्यात्मिक ऊर्जा अनुभवल्याची भावना व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×