गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ९२ लाखांची केली फसवणूक

गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ९२ लाखांची केली फसवणूक

 सख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गुंतवणुकीच्या आमिषाने चौघांची ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. आहे. याप्रकरणी सख्या भावांविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गौरव प्रदीपकुमार चंद्र (वय ४९, रा. महंमदवाडी, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीटर शुक्ला आणि सॅमसन शुक्ला (रा. कॅलिफोर्निया अपार्टमेंट, एनआयबीएम रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लूटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव चंद्र यांची आरोपी पीटर आणि सॅमसन यांच्याशी परिचितामार्फत ओळख झाली होती. आरोपींनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा तीन ते सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. चंद्र यांच्यासह परिचितांनी आरोपींच्या व्यवसायात ९२ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, आरोपींनी त्यांना परतावा दिला नाही. परतावा न दिल्याने चंद्र आणि परिचितांनी शुक्ला यांना पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत केली नाही.

फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत. दरम्यान, शहरात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढत आहे. वेगवेगळ्या योजनेचे आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×