Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लूटले

ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लूटले

९० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार

marathinews24.com

पुणे – घरात एकटे असलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चोरट्यांनी ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना हडपसर भागातील मांजरी परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ६५ वर्षीय नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सिंहगड रस्ता भागात टोळक्याचा राडा; १२ ते १५ वाहनांची केली तोडफोड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक मांजरीतील तुकाराम तुपेनगर भागात राहायला आहेत. रविवारी रात्री आठच्या सुमारास ते घरात एकटे असताना, अचानक एक चोरटा घरात शिरला. त्याने तक्रारदार जेष्ठाच्या गुडघ्यावर कठीण वस्तूने प्रहार केला. चोरट्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यांच्या गळ्यातील ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला. ज्येष्ठ नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावत आले. घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. घरात एकटे असलेल्या ज्येष्ठाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटल्याची घटना घडल्याने परिसरात घबराट उडाली. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×