भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – जबरी चोरीच्या गुन्ह्यात मागील ५ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस अखेर भारती विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. गणेश अशोक गुंजाळ (वय ३०, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, कात्रज गाव, पुणे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीचा माग काढण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक कार्यरत होते.
जादा परताव्याचे आमिष पडले ३६ लाखांना; महिलेला सायबर चोरट्यांचा गंडा – सविस्तर बातमी
पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे यांच्याकडून आरोपीचा शोध घेतला जात होता. तपासदरम्यान आरोपी हा भारतनगर, कात्रज परिसरात आरोपी असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार २० मे रोजी पथकाने आरोपी गणेश गुंजाळ याला अटक केली.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली.