Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

घरफोडीच्या तीन घटनांमध्ये २७ लाखांचा ऐवज चोरीला

ज्येष्ठाला धक्का देऊन सोनसाखळी हिसकाविली

संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल

marathinews24.com

पुणे – शहरात दिवसेंदिवस घरफोड्यांचे प्रमाण वाढत असून, शुक्रवारी (दि. १३) घरफोडीच्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल २६ लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यापक्ररणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रविवार पेठेतील रामलिला ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान चोरांनी गुरूवारी (दि. १२) मध्यरात्री फोडले. दुकान मालक राजीव खताळ (३५, रा. कोंढवा खुर्द) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुकानातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह हिऱ्याचे दागिने व रोख रक्कम असा १४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हाळे करत आहेत.

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी 

दुसऱ्या घटनेत, घरातील कपाटात ठेवलेले लक्ष्मी मुर्ती, सोन्याचे दागिने, लेडीज घड्याळ व रोख रक्कम असा ४३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी ११ ते १३ जून दरम्यान चोरून नेला आहे. याप्रकरणी कांता चौधरी (६२, रा. शिवकृपा निवास, लेन नं. ३, साठे वस्ती, लोहगाव, धानोरी रोड) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पुढील तपास पोलिस हवालदार आदलिंग करत आहेत. तर चंदननगर परिसरात चोरट्यांनी तुषार गुप्ता (३१, रा. तत्त्व सोसायटी, चंदननगर) यांच्या घरात चोरी केली आहे.

गुप्ता यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री एक ते पहाटे चारच्या सुमारास गुप्ता यांचे घर बंद असताना, चोरांनी घराच्या मुख्य दरवाजा तोडला.त्यानंतर घरात प्रवेश करत बेडरूममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, मुर्ती व रोख रक्कम असा ११ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×