Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

तरुणीच्या खून प्रकरणी पसार आरोपी गजाआड

Warje Malwadi Crime News

ऊरळी कांचनमधील घटना

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील ऊरळी कांचन भागात मृतावस्थेत सापडलेल्या २० वर्षांच्या तरुणीचा खून प्रकरणाचा छडा लावण्यात ग्रामीण पोेलिसांना यश आले. निर्जन वाटेवरून घरी निघालेल्या तरुणीला गाठून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. तरुणीने आरोपीला विरोध केल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले असून, पोलिसांना याप्रकरणी एकाला अटक केली आहे. ही घटना १४ ऑक्टोबरला घडली होती.

ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेल्या मुलाची फसवणूक; दोघे गजाआड – सविस्तर बातमी 

दिनेश संजय पाटोळे (वय २६, रा. गोळे वस्ती, ऊरळी कांचन, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. १४ ऑक्टोबर रोजी ऊरळी कांचन भागातील नायगाव रस्त्यावर २० वर्षांची तरुण मृतावस्थेत सापडली होती. या घटनेची माहिती मिळताच ऊरळी कांचन पोलीस आणि ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना पिशवी (सॅक) सापडली होती. तरुणीच्या डोक्याला जखम झाली होती. शवविच्छेदनात तरुणीच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केल्याने तिचा खून झाल्याचे उघडकीस आले होते.

पोलिसांनी तरुणीची ओळख पटविली. तेव्हा तरुणी ऊरळी कांचनमधील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तरुणीच्या भावाने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली होती. संवेदनशील गुन्हा असल्याने पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करण्यासाठी चार पथके तयार केली होती. पोलिसांनी परिसरातील ७० ते ८० ठिकाणी असलेले सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी जवळपास २०० ते २५० नागरिकांकडे चौकशी केली. १४ ऑक्टोबरला नायगाव रस्त्याने संशयित दुचाकीवरून निघाला होता. चित्रीकरणात संशयित दुचाकीस्वार आढळून आला होता. पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार दिनेश पाटोळेला ताब्यात घेतले. पाटोळेने रस्त्याने एकट्या निघालेल्या तरुणीला अडवून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. तिने विरोध केल्यानंतर डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली पाटोळेने पोलिसांना दिली.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, ऊरळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर बाजिगरे, दत्ताजीराव मोहिते, उपनिरीक्षक अमित सिदपाटील, ईश्वर जाधव, सचिन घाडगे, आसिफ शेख, अतुल डेरे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code :
  • Message :
error: Content is protected !!
Scroll to Top
×