ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेल्या मुलाची फसवणूक; दोघे गजाआड

ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेल्या मुलाची फसवणूक; दोघे गजाआड

शिक्रापूर पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेल्या शाळकरी मुलाला ‘गेमिंग आयडी’ देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचे दागिने घेणाऱ्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली. मयूर ऊर्फ शशिकांत मुंजाजी भिसाड (वय २१, रा. परभणी), तसेच किशाेर डहाळे (वय २२, रा. परभणी) यांना अटक करण्यात आली. शाळकरी मुलाच्या वडिलांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महिला डॉक्टरची आत्महत्या, समाजातील सामूहिक अपयशाची वेळ – डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा भागातील एक शाळकरी मुलगा ऑनलाइन गेमच्या आहारी गेला होता. आरोपी भिसाड याच्याशी मुलाची समाजमाध्यमातून ओळख झाली होती. भिसाड याने ऑनलाईन गेमच्या ‘गेमिंग आयडी’ देतो, असे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर मुलाला घरातून पाच तोळे सोन्याचे दागिने आणण्यास प्रवृत्त केले. मुलनो घरातून घेतलेले दागिने आरोपी भिसाड याला नेऊन दिले. त्यानंतर भिसाडने हे दागिने परभणीतील साथीदार डहाळे याला दिले. शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. तांत्रिक तपासात शाळकरी मुलगा आणि आरोपी भिसाड हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. दोघांमध्ये समाजमाध्यमातून संवादही झाला होता. भिसाडने मुलाला ‘गेमिंग आयडी’ देण्याचे आमिष दाखवून घरातून दागिने आणण्यास सांगितले. याबाबतची माहिती तपासात मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करुन भिसाडला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख ६२ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड, सहायक निरीक्षक राहुल देशमुख, विनायक मोहिते, प्रताप कांबळे यांनी ही कारवाई केली.

मुलांवर लक्ष ठेवावे

शाळकरी मुले समाजमाध्यमातील विविध आमिषांना बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. मुले ऑनलाइन गेमच्या आहारी गेले असून, पालकांनी मुलांना शक्यतो मोबाइल संच वापरास देऊ नये. मोबाइल फक्त गरजेपुरता वापरण्यास देणे. मुलांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास पालकांनी त्वरीत पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×