डाॅ. नीलम गोऱ्हे यांची तपासाच्या अनुषंगाने ‘सीआयडी’ अधिकाऱ्यांशी चर्चा
marathinews24.com
पुणे – विषारी दारू प्रकरणात पिंपरी-चिंचवड, तसेच पुणे शहरातील मृत, तसेच बाधितांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) प्रयत्न करावेत. ‘सीआयडी’च्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी जनतेशी संपर्क साधावा’, अशा सूचना शिवसेना नेत्या, आमदार डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावा – सविस्तर बातमी
विषारी दारू प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने डाॅ. गोऱ्हे यांनी मंगळवारी ‘सीआयडी’ कार्यालयास भेट दिली. या वेळी डाॅ. गाेऱ्हे यांनी तपास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ‘सीआयडी’चे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलस अधीक्षक शफकत आमना, उपअधीक्षक सचिन चव्हाण, शामराव काळे उपस्थित होते. ‘सीआयडी’तील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर डाॅ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘विषारी दारु प्याल्याने मृत्यू झाला. मात्र, विषारी दारू प्याल्यानंतर काहींना त्रासही झाला. अशा रुग्णांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करावी. विषारी दारू प्रकरणानंतर संशयास्पद मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांशी संवाद साधवा. या प्रकरणात मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आण्ण्यासाठी ‘सीआयडी’ने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस अधिकारी, तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी जनतेशी संवाद साधावा. तपाासाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त माहिती गोळा करावी,’, असे त्यांनी सांगितले. डाॅ. गोहे म्हणाल्या, ‘विषारी दारू प्याल्यानंतर काही जणांना त्रास झाला. काहीजणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले कष्टकरी वर्गातील होते. मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय मूळगावी परतल्याची शक्यता आहे. त्यांची माहिती संकलित करायलाहवी. वृत्तपत्र, प्रसारमाध्यमातून आवाहन केल्यास तपास अधिकाऱ्यांना उपयु्क्त माहिती मिळेल, विषारी दारु प्रकरणात कुटुंबीयांवर दबाब आणण्याचा प्रयत्न झाला असले, याचीही माहिती घ्यावी’, असे डाॅ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
पिंपरी, हडपसमध्ये तात्पुरते संपर्क कार्यालय सुरू करा
विषारी दारू प्रकरणात पिंपरीतील फुगेवाडी, दापोडी, तसेच हडपसर भागातील नागरिकांचा मृत्यू झाला. या भागात ‘सीआयडी’ने तात्पुरते संपर्क कार्यालय सुरू करावे. अधिकाऱ्यांनी त्यंचे मोबाइल क्रमांक समाजमाध्यमात प्रसारित करावेत. जेणेकरुन नागरिक थेट तक्रार करु शकतील’, असे डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
उत्पादन शु्ल्क विभागासह सर्व यंत्रणांची जबाबदारी
उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख यांच्याकडे काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी उत्पादनशुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर नााराजी व्यक्त केली. ‘शहरातील अवैध गावठी दारू धंद्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला माहिती होती. अशा धंद्यावर कारवाई झाली होती. केवळ कारवाई करुन भागत नाही. त्याचे प्रत्यक्ष परिणाण दिसणे आवश्यक आहे’, असे डाॅ. गाेऱ्हे यांनी स्पष्ट केले. महापालिकेने बाधित कुटुंबीसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली. मात्र, अद्याप अनेक कुटुंबांपर्यंत मदत पोहोचली नाही. मृत व्यक्तीची कुटुंबे ही दुर्घटनेची बळी ठरली. त्यांना आधार दिला तर, ते साक्ष देण्यास पुढे येतील’, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.





















