Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

गावठी कट्टयासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींना बेड्या

गावठी कट्टयासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींना बेड्या

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – गावठी कट्टयासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. कात्रज कोंढवा रोडवरील कपिलामृत डेअरीजवळ ५ जूनला मोकळ्या मैदानात कारवाई केली. शुभम प्रमोद माने (वय २६, रा. शिवशंभूनगर) आणि गणेश बाबासाहेब लंके (वय २७, रा. महादेवनगर, शेलार मळा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

उसण्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खून – सविस्तर बातमी 

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे हे पथकासह हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघा आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शुभम प्रमोद माने (वय २६) आणि गणेश बाबासाहेब लंके (वय २७, रा. महादेवनगर, शेलार मळा) हे दोघे संशयास्पदरित्या गावठी कट्टा हाताळताना आढळून आले. त्यांच्याकडून ३० हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. दोघांविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ आणि भारतीय दंड संहिता कलम ३(५) अंतर्गत गुन्हा केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, सौरभ वायदंडे, संग्राम पवार, सागर कोंडे केतन लोंखडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×