Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

उसण्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खून

प्रेमसंबंध तोडल्याने कात्रजमध्ये तरुणीचा खून

सिंहगड रस्ता भागातील घटना

पुणे – हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना धायरीतील रायकर मळा परिसरात घडली. याप्रकरणी एका रिक्षा चालकाला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली.

दुचाकीच्या डिक्कीतून ऐवजाची केली चोरी – सविस्तर बातमी
श्यामली कमलेश सरकार (वय ४०, रा. सूर्यउज्वल हाईट्स, रायकर मळा, धायरी, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नितीन चंद्रकांत पंडित (वय ५१ ,रा. निसर्ग हाईटजवळ, धायरी, सिंहगड रस्ता) याला अटक केली आहे. पोलीस कर्मचारी नितीन तनपुरे यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामली सरकार आणि आरोपी नितीन पंडित हे ओळखीचे होते. ती बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत देहविक्रय करत असताना पंडित तिला रिक्षातून दररोज बुधवार पेठेत सोडायचा. दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाले होते. तिने पंडितकडून ४० ते ५० हजार रुपये उसने घेतले होते.

पंडितने तिला पैसे परत मागितले होते. पैसे परत देण्यास ती टाळाटाळ करत असल्याने दोधांमध्ये वाद झाले. बुधवारी (४ जून) दुपारी चारच्या सुमारास पंडित तिला घेण्यासाठी धायरीतील रायकर मळा परिसरात गेला. सरकारच्या सदनिकेत तो गेला. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादातून पंडितने तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पंडित हा बुधवारी रात्री नांदेड सिटी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि सरकारचा खून केल्याची कबुली दिली.

पीडितेला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गुुरुदत्त मोरे यांनी दिली. पोलीस निरीक्षक मोरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×