चोरलेल्या डेबीट कार्डद्वारे सव्वा दोन लाख रूपये काढले
marathinews24.com
पुणे – दुचाकीच्या डिक्कीतून मोबाइल, मेमरीकार्डसह पाकिट, डेबीट कार्डची चोरी करीत चोरट्याने बँक खात्यातून तब्बल २ लाख २१ हजार रूपये काढून घेत फसवणूक केली आहे. ही घटना २ जूनला सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील रामटेकडी परिसरातील आयकॉन डिजीटल झोन गेटजवळ घडली आहे. याप्रकरणी अरविंद काळू गायकवाड (वय ३५ रा. सिंहगड रोड, धायरी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेम्पोच्या धडकेत दुचाकी तरुण ठार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अरविंद हे २ जूनला सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील रामटेकडी परिसरात परिक्षा देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी मोबाइल, पाकिट, मेमरीकार्डसह इतर ऐवज दुचाकीच्या डिक्कीत ठेवला होता. त्यानंतर ते परिक्षेसाठी गेले असता, चोरट्यांनी दुचाकीची डिक्की उचकटून ऐवजाची चोरी केली.
त्यावेळी डेबीट कार्डद्वारे आरोपींनी बँक खात्यातून २ लाख २१ हजार रूपये काढून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे तपास करीत आहेत.