Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

तर भाडेकरूसह घरमालकांविरूद्ध होणार कारवाई

पुण्यात अल्पवयीन आरोपींची धिंड पोलिसांना भोवणार

पुणे पोलिसांची विशेष मोहीम

marathinews24.com

पुणे – शहरात भाडेकरू व घरमालकांच्या पडताळणीसाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. घरमालकांनी भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष सादर करणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न करणार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर परराज्य व इतर जिल्ह्यांतील नागरिक वास्तव्यास येत असल्याने त्यांच्या पडताळणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी ‘भाडेकरू/पेईंग गेस्ट माहिती विनंती’ या सुविधेद्वारे घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदविणे आवश्यक आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय दराडे, उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली मोहिम सुरू केली आहे.

मैत्रिणीवरुन झालेल्या वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

शहरातील वाढती लोकसंख्या, परराज्यासह इतर जिल्ह्यांतून रोजगार, शिक्षण आणि व्यवसायासाठी होणारे स्थलांतर लक्षात घेऊन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष शाखेच्या समन्वयातून विविध पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांच्या सहभागाने राबविण्यात येत आहे. सर्वाधिक भाडेकरू असलेल्या परिसरांमध्ये पोलिसांकडून प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती संकलित केली जात आहे. घर मालकांनी भाडेकरूंची माहिती दिली आहे का, तसेच संबंधित व्यक्तींची पडताळणी केली आहे का, याची तपासणी केली जात आहे. माहिती न दिल्यास संबंधित घरमालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले आहे.

७ दिवसांत ४१ घरमालकांविरूद्ध कारवाई

विशेष शाखेने दिलेल्या माहितीनुसार २१ ते २८ जुलै कालावधीत ४१ घरमालक/भाडेकरूंवर कारवाई केली आहे. तसेच मोहिमेमुळे शहरातील सुरक्षितता वाढविणे, संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे हा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. दरम्यान, यापुढील काळात बेशिस्त घरमालकांसह भाडेकरूविरूद्ध कारवाईचा वेग आणखी वाढवला जाणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×