Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

मेफेड्रोन विक्रीत अहिल्यानगरचा हवालदार गोत्यात

मेफेड्रोन विक्रीत अहिल्यानगरचा हवालदार गोत्यात

तब्बल १० किलो ५०० ग्रॅम एमडी विक्रीचे रॅकेट उध्वस्त

marathinews24.com

पुणे – ग्रामीण पोलिसांनी शिरूरमध्ये मेफेड्रोन विक्रीचे रॅकेट पकडले होते. तब्बल साडे दहा किलो मेफेड्रोनचा साठा जप्त केला आहे. ड्रग्ज रॅकेटमध्ये अहिल्यानगर पोलिस दलातील हवालदाराचाही समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत चौघांना याप्रकरणात अटक झाली आहे.

तळजाई वसाहतीत वाहनांची तोडफोड – सविस्तर बातमी 

पोलिस हवालदार शामसुंदर विश्वनाथ गुजर (वय ३९, रा. नेप्ती, ता. अहिल्यानगर) याच्यासह शादाब रियाज शेख (वय ४१, रा. डंबेनाला शिरुर ता. शिरुर), ज्ञानदेव उर्फ माऊली बाळू शिंदे (वय ३६ रा. कोहकडी ता. पारनेर जि. अहिल्यानगर), महेश दादाभाऊ गायकवाड (वय २७, रा. हिंगणी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) ऋषिकेश प्रकाश चित्तर (वय ३५, रा. कुरुंद ता. पारनेर जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ड्रग्ज रॅकेट चालविणाऱ्यांसह विक्रेत्यांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा दणका दिला आहे. पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ड्रग्जविरोधात विशेष मोहिम हाती घेतली आहे. दरम्यान, शिरूर शहरात मेफेड्रोन ड्रग्ज रॅकेट सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथक तयार करून शिरूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या.

शिरूरमधील गॅरेज चालक शादाब शेख (वय ४१, रा. डंबेनाला शिरुर ता. शिरुर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ किलो मेफेड्रोन जप्त केले. तपासादरम्यान ड्रग्ज पुरवणाऱ्या ज्ञानदेव उर्फ माऊली शिंदे, महेश गायकवाड, ऋषिकेश चित्तर यांना पकडण्यात आले. चौकशीतून त्यांच्याकडून तब्बल साडे नऊ किलो आणखी मेफेड्रोन जप्त केले. याप्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेल्या पोलिस हवलदार शामसुंदर गुजर हा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यालाही पकडले. त्याच्याकडे चौकशी सुरू असून, तोच ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल पोलीस उपनिरीक्षक पंडित मांजरे, उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलिस हवालदार निलेश शिंदे, जनार्दन शेळके, तुषार पंधारे, संजय जाधव, पोपट गायकवाड, अंबादास थोरे, सचिन भोई यांच्या पथकाने केली.

हवालदाराचे व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड पथकाच्या हाती

ड्रग्ज रॅकेटमधील सूत्रधार पोलिस हवालदार शामसुंदर गुजर असल्याची शक्यता आहे. रॅकेटमधील काही आरोपींच्या व्हॉट्सअप कॉलवर तो सातत्याने संपर्कात होता. त्यातील काही आरोपींनी त्याचे व्हॉट्सअप कॉलही रेकॉर्ड केले आहे. हे रेकॉर्डिंगच पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×