Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

तळजाई वसाहतीत वाहनांची तोडफोड

तळजाई वसाहतीत वाहनांची तोडफोड

टोळक्याने दहशत माजवून १५ वाहनांची केली तोडफोड

marathinews24.com

पुणे – शहरातील पद्मावतीतील तळजाई वसाहतीत टोळक्याने दहशत माजवून १५ वाहनांची तोडफोड केली. किरकोळ वादातून टोळक्याने तरुणाला मारहाण केली. टोळक्याने बांबू, तसेच कोयते उगारून तळजाई वसाहतीत दहशत माजविल्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिक भयभीत झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आईने खेळायला जाऊ न दिल्यामुळे विद्यार्थ्यांने घेतला आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मावतीतील तळजाई वसाहतीत राहणाऱ्या एका तरुणाचा आरोपींशी वाद झाला होता. मध्यरात्री अडीचच्या सुमारास तरुण तळजाई वसाहत परिसरातून निघाला होता. आरोपींनी तरुणाला अडवून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींच्या तावडीतून तरुण पळाला. त्यानंतर खंडाळे चौकात टोळके त्याचा पाठलाग करत आले. आरोपींनी काेयते आणि बांबू उगारून परिसरात दहशत माजविली. नागरिकांना शिवीगाळ करून टेम्पोसह दुचाकींची तोडफोड केली. तोडफोडीची घटना सुरू असताना नागरिक भयभीत झाले. त्यांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात असून, सात ते आठ जणांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. तळजाई वसाहत तोडफोडीची घटना घडल्यानंतर रहिवासी दहशतीखाली आहेत. तळजाई वसाहतीत गेल्या वर्षी मे महिन्यात टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली होती. तळजाई वसाहतीतील तोडफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सराइतांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली होती. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी तळजाई वसाहतीतील रहिवाशांनी केली आहे.

तळजाई वसाहतीत टोळक्याने १५ ते १६ वाहनांची तोडफोड केली. वैयक्तिक वादातून ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून, साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

– मिलिंद मोहिते, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×