Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

आईने खेळायला जाऊ न दिल्यामुळे विद्यार्थ्यांने केली आत्महत्या

आईने खेळायला जाऊ न दिल्यामुळे विद्यार्थ्यांने घेतला आत्महत्या

घटनेने परिसरात हळहळ

marathinews24.com

बीड – आईने खेळायला जाऊ न दिल्याच्या रागातून १५ वर्षीय विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केजमध्ये रविवारी घडली आहे. प्रतीक रामेश्वर डोईफोडे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो विवेकानंद विद्या मंदिरात ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत होता.

घटस्फोटाच आमिष, लग्नाचा बहाण्याने महिलेवर अत्याचार – सविस्तर बातमी 

रविवारची सुटी असल्याने सकाळी दहा वाजेच्या सुमारास प्रतीकचा एक मित्र त्याला खेळण्यासाठी घरी बोलवायला गेला होता. मात्र, बाहेर ऊन असल्याने आईने प्रतीकला ऊन आहे, चार वाजल्यानंतर खेळायला जा असे सांगितले. त्याचा राग प्रतीकच्या मनात बसल्याने त्याने बेडरूममध्ये जाऊन कडी लावून घेतली. पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आई स्वयंपाकघरात कामात व्यस्त असल्याने तिचे बेडरूमकडे लक्ष गेले नाही. दुपारी दीडच्या सुमारास जेवणासाठी त्याला उठवायला गेल्यावर दरवाजा उघडला नाही. शेजा-यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता प्रतीक जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. रविवारी रात्री उशिरा क्रांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याघटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विद्यालयावर शोककळा, महिनाभरातील दुसरी घटना

प्रतीक ज्या शाळेत शिकत होता, त्याच शाळेतील तनुजा चाटे या ९ वीच्या विद्यार्थिनीनेही २८ डिसेंबरला आत्महत्या केली होती. एकाच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी महिन्याभराच्या अंतरात टोकाचे पाऊल उचलल्याने शिक्षक आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुलांच्या मनातील हा वाढता राग आणि नैराश्य आता चिंतेचा विषय ठरत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×