Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

घटस्फोटाच आमिष, लग्नाचा बहाण्याने महिलेवर अत्याचार

घटस्फोटाच आमिष, लग्नाचा बहाण्याने महिलेवर अत्याचार

तरुणाने महिलेकडून उकळले २१ लाख

marathinews24.com

पुणे – नवऱ्यापासून घटस्फोट मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणाने महिलेवर अत्याचार केला आहे. भावनिकता निर्माण करून जवळीकता साधल्यानंतर तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. शरीरसंबंधाचे फोटो-व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून तब्बल २१ लाखाची खंडणी उकळली आहे.

बस प्रवासात तरूणीची सोन्याची चैन चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी रोहित उत्तमराव लाडके (वय ३२) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ४३ वर्षीय महिलेने फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २०१९ ते जानेवारी २०२६ या कालावधीत पुण्यातील फुरसुंगी परिसरात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला विवाहित असून, कौटुंबिक कारणातून पती-पत्नीत वादविवाद आहेत. महिलेशी आरोपी रोहितची ओळख झाल्यानंतर त्याने विश्वास संपादन केला. पतीपासून घटस्फोट मिळून देतो, अशी बतावणी केली. नंतर स्वत: तिच्याशी लग्न करणार असल्याचे आमिष दाखवले. महिलेच्या इच्छेविरुद्ध त्याने वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण केले. नकळत फोटो व व्हिडिओ काढून ठेवले. काही दिवसांनी महिलेशी वाद होऊ लागल्यानंतर महिलेने त्याला नकार देण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने काढलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी स्वरूपात रोख रक्कम आणि दागिने उकळले. त्याने महिलेकडून १८ लाख, सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि दुचाकी असा २१ लाख ४५ हजाराचा ऐवज आरोपीने उकळल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×