Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

पुण्यातील नवले ब्रिजजवळ पुन्हा अपघात

स्कूल बसने मोटार चालकाला दिली धडक

marathinews24.com

पुणे – शहरालगत असलेल्या नवले पुलावर अपघातांचे सत्र कायम असून, सातत्याने अपघाताच्या घटनांमुळे नागरिकांसह प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (दि. ८) सकाळच्या सुमारास नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला. स्कूल बस चालकाने मोटारीला जोरदार धडक दिल्यामुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अपघातात दोघेजण जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दुचाकी चोरणार्‍याला बेड्या, ५ गाड्या जप्त – सविस्तर बातमी

नवले ब्रीज परिसरातून स्कुल बस मार्गस्थ होत होती. त्यावेळी चालकाने समोरील मोटार चालकाला धडक दिली. त्यामुळे धडकेने कारचा मागील भागाचा चक्काचूर झाला होता. धडकेत कारमधील दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. स्कूल बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. हा अपघात किरकोळ स्वरूपाचा असला तरी नवले पुलावरील सततच्या दुर्घटनांमुळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज असल्याची मागणी पुन्हा एकदा केली जात आहे.

स्थानिकांसह वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण

सोमवारी सकाळच्या सुमारास अपघात झाल्यानंतर पुन्हा एकदा नवले ब्रीज चर्चेत आला होता. सुदैवाने अपघात मोठा नसल्यामुळे अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, महिन्याभरात ब्रीजवर सातत्याने अपघात घडत असल्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांसह परिसरातून मार्गस्थ होणार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×