Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

दुचाकी चोरणार्‍याला बेड्या, ५ गाड्या जप्त

हडपसर पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – वाहन चोरी करणार्‍या चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रूपये किंमतीच्या ४ दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यासोबतच अल्पवयीकडून दुचाकी जप्त केली आहे. रविंद्र शिवाजी घाटे (वय ४० रा. मु.पो. दहीवाडी, ता. तुळजापूर, धाराशिव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी हडपसर पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. पोलीस अंमलदार रविकांत कचरे यांना दुचाकी चोरट्याची माहिती मिळाली. पथकाने बार्शी, तुळजापूर, लातुर परिसरात शोध मोहिम राबवून रविंद्र घाटे याला ताब्यात घेतले.

गुुजरातमधील आंतरराज्यीय सराईत टोळीला अटक – सविस्तर बातमी

दुसर्‍या स्वतंत्र तपासामध्ये अल्पवयीनाकडून दुचाकी जप्त केली आहे. दरम्यान वाहन चोरी रोखण्यासाठी आम्ही सातत्याने प्राधान्य दिले असून, त्यादृष्टीने वाढीव पेट्रोलिंग करण्यात येत असल्याचे संजय मोगले यांनी सांगितले आहे. ही कामगिरी उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महाविर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×