गुुजरातमधील आंतरराज्यीय सराईत टोळीला अटक

राजगुरूनगरमध्ये टाकणार होते दरोडा; पुणे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

marathinews24.com

पुणे – दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय सराईत टोळीला बेड्या ठोकण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यांच्या ताब्यातून टेम्पो, स्कु डायव्हर, गज, रॉड, कटावणी, बॅटरी, पट्टी, कटर, धारदार चॉपर असे दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे. टोळीविरूद्ध यापुर्वी गुजरातसह आळेफाटा, मंचर, सिन्नर याठिकाणी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हातभट्टी दारुधंद्यावर कारवाईचा बडगा; थेऊर फाटयाजवळ कारवाई – सविस्तर बातमी

इरफान अब्दुलअमीद दुर्वेश ( वय ४२ रा.गुजरात ) मोहम्मद अली हुसेन रेहमत (वय २१ रा. गुजरात ) उमरफारूख अब्दुलसत्तार जाडी (वय ३६ रा. गेहनीपलोट, वेझलपुर, गुजरात) यांना अटक केले आहे. त्यांचे दोन साथीदार पसार झाले आहेत.

खेड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २ डिसेंबरला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी होलेवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत रात्री साडेनउच्या सुमारास रस्त्यात टेम्पो संशयीतरित्या उभा होता. टेम्पोत ५ जण बसल्याचे दिसून आले. त्याच्याकडे चौकशी करताना दोघेजण पळून गेले. वाहनाच्या केबीनमध्ये स्कु डायव्हर, गज, रॉड, कटावणी, बॅटरी, चॉपर असे दरोड्याचे साहित्य मिळून आले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागिय अधिकारी अमोल मांडवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेडचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, एपीआय महादेव शेलार, एपीआय प्रदिपसिंग सिसोदे, दिपक साबळे, विक्रमसिंह तापकिर, संदिप वारे, जनार्धन शेळके, तुषार पंदारे, संजु जाधव, संदिप वारे, अतुल डेरे, हेमंत विरोळे, सागर धुमाळ, अक्षय नवले, संतोष मोरे, एम कुडेकर, बी बीडकर, निलेश कोळसे, संकेत कवडे यांनी केली.

टोळीने ५ लाखांचे टायर केले होती चोरी

अटकेतील सराईत टोळीने १४ नोव्हेंबर २०२५ रोजी शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढापुरी ( ता. शिरूर) याठिकाणावरील एचपी पेट्रोल पंपामध्ये उभ्या असलेल्या ट्रकमधील ५ लाख १७ हजारांचे टायर चोरून नेले होते. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, याप्रकरणी शिकापुर पोलीस ठाण्यता गुन्हा दाखल आहे. दरम्यान, संबंधित टोळी गुजरात राज्यातील गोध्रामधील असून, त्यांच्याविरूद्ध यापुर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचेही उघडकीस आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×