Breking News
एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर‘स्वप्नसुंदरी मी भारताची २०२६’ : पुण्यात सौंदर्य स्पर्धेचे आयोजननगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावीविधिमंडळात विद्यार्थ्यांची अभ्यासक भेट; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद ठरला आकर्षणरोजगाराच्या नावाखालील फसवणुकीपासून सावध रहा अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज व्याज परतावा योजना अधिक सुलभबारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची द्वितीय यादृच्छिकीकरण प्रक्रिया पूर्णमुख्यमंत्री रोजगार योजनेतून स्वावलंबन; इतरांनाही दिली रोजगाराची संधीराम नदीच्या ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास व्हावा-प्रा. देवेंद्र देशपांडेजेष्ठाला ट्रेडींगमध्ये गुुंतवणूकीचे आमिष पडले ३३ लाखांना

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर पुन्हा अपघात

वाहने एकमेकांवर आदळली; सुदैवाने जिवितहानी नाही

marathinews24.com

पुणे – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात अपघातांचे सत्र कायम आहे. शनिवारी मध्यरात्री बाह्यवळण मार्गावर दरी पूल परिसरात वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी

बाह्यळण मार्गावरील जांभुळवाडी येथील दरी पूल परिसरात शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास तीन ते चार वाहने एकमेकांवर आदळली. अपघातात वाहनांचे नुकसान झाले. अपघातात तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात किरकोळ जखमी झालेल्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यवर प्राथमिक उपचार करण्यात झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. बाह्यवळण मार्गावर रात्री वर्दळ कमी नसल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. क्रेनच्या सहायाने पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूल काढण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात १३ मार्च रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास एका भरधाव ट्रकने सिग्नलला थांबलेल्या वाहनांना धडक दिली. अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. कात्रज बोगद्याकडून येणाऱ्या भरधाव ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. तीव्र उतारावर त्याने एकापाठोपाठ वाहनांना धडक दिली. धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×