Breking News
गाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक

कर्ज मंजूर करण्याच्या आमिषाने बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

कोथरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गॅस टंचाईची झळ सामान्यांना बसली आहे. गॅस टंचाईमुळे ऑनलाइन इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी ३ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागात राहायला आहेत. त्यांनी समाज माध्यमात इलेक्ट्रीक शेगडीची जाहिरात पाहिली होती. गॅस टंचाईमुळे त्यांनी शेगडी खरेदी करण्याचे निश्चित केले. त्यानंतर त्यांनी जाहिरातीतील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. सायबर चोरट्यांनी शेगडी खरेदीचे पैसे ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागतील, असे त्यांना सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली.

या माहितीचा दुरुपयोग करुन चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून तीन लाख दहा हजार रुपये दुसऱ्या एका खात्यात हस्तांतरित केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.

गॅस टंचाईमुळे चोरट्यांकडून नागरिकांना इलेक्ट्रीक शेगडी, तसेच सिलिंडर देण्याचे आमिष दाखविले जात आहे. नागरिकांनी चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे. गॅस वितरण करणाऱ्या कंपनीच्या नावे फसवणूक करणारे संदेश चोरट्यांकडून पाठविले जातात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×