Breking News
गाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने महिलेची फसवणूक

ऑनलाइन खेळणी खरेदी महागात

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी चंदननगर भागातील एका महिलेची ३ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ४८ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोथरूडमधील सोसायटीत टोळक्याची दहशत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला चंदननगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर काही दिवसांपूर्वी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतील. एका तारांकित हाॅटेलला दर्शक पसंती (रिव्ह्यूज) मिळवून द्यायचे आहेत, अशी बतावणी करुन चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या खात्यात परताव्यापोटी काही रक्कम दिली. परतावा मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला. चोरट्यांनी ऑनलाइन टास्कमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. पैसे गुंतविल्यानंतर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर महिलेला परतावा दिला नाही, तसेच मूळ रक्कमही दिली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×