कोथरूडमधील सोसायटीत टोळक्याची दहशत

कोथरूडमधील सोसायटीत टोळक्याची दहशत

घरात शिरून तोडफोड करणारे अटकेत

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून टोळक्याने दहशत माजविल्याची घटना कोथरूडमधील श्रावणधारा एसआरए वसाहतीत घडली. एका तरुणाच्या घरात शिरून टोळक्याने साहित्याची तोडफोड केली. तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी सहा जणांना अटक केली. याप्रकरणी अजय सुनील महाजन (वय २१, रा. कोथरूड), अभिजित गंगाधर ओव्हाळ (वय ३०), सनी अविनाश सत्रके (वय २०), अभि उर्फ अभिषेक घारे (वय २०), समर्थ राजेश जगताप (वय १८), सूरज छगन कदम (वय २६, सर्व रा. श्रावणधारा सोसायटी, कोथरूड) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल सुभाष गायकवाड (वय २२, रा. कोथरूड) याने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पाण्याची टाकी कोसळून कामगाराचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड आणि आरोपींमध्ये भांडणे झाले होते. वादातून १९ मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास राहुल गायकवाड घरी होता. त्या वेळी आरोपी गायकवाड याच्या घरात शिरले. घराचा दरवाजा, गॅस शेगडी, स्टिलची भांडी, तसेच भिंतीवर कोयते आपटून दहशत माजविली. त्यानंतर आरोपींनी सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ करुन दहशत माजविली. सोसायटीतील दोघांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×