Breking News
गाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

पाण्याची टाकी कोसळून कामगाराचा मृत्यू

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एरंडवणे भागात दुर्घटना

marathinews24.com

पुणे – इमारतीच्या छतावर प्लास्टिक टाकी बसविताना झालेल्या दुर्घटनेत टाकी कोसळून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना एरंडवणे भागातील एका सोसायटीत घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी एका विरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल श्रीकांत सतनामी (वय २१, रा. रायकर मळा, धायरी, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई सीमा (वय ४४) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात पारपत्र कार्यालयात बाँम्ब ठेवल्याची धमकी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडवणे परिसरातील गुलमोहोर अपार्टमेंटच्या आवारात रोगनिदान केंद्र (पॅथोलाॅजी लॅबोरटरी) आहे. रोगनिदान केंद्रात पाणी पुरवठा करण्यासाठी टाकी बसविण्याचे काम २० फेब्रुवारी रोजी दुपारी करण्यात येत होते. टाकी बसविण्यासाठी गजाचा आधार देण्यात आला होता. त्या वेळी गज तुटल्याने टाकी बसविणाऱ्या राहुल सतनामी याच्या अंगावर टाकी काेसळली. त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×