पुण्यात पारपत्र कार्यालयात बाँम्ब ठेवल्याची धमकी

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

ईमेलद्वारे धमकी प्रकरणात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील बाणेर येथील पारपत्र कार्यालयात बाँम्ब ठेवल्याची धमकी दिल्याची घटना घडली. बाँम्बच्या अफवेमुळे पारपत्र कार्यालयात घबराट उडाली. पारपत्र कार्यालयात ईमेलद्वारे बाँम्बची धमकी देणाऱ्याविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पारपत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ईमेलद्वारे धमकी देणाऱ्या एका विरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदाशिव पेठेत ओैषध दुकानातून पावणेतीन लाखांची रोकड चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील पारपत्र कार्यालयात सायनाईड गॅस असलेले १९ बाँम्ब ठेवण्यात आले आहेत, अशी धमकी देणारा संदेश सौरभ बिश्वास नावाच्या एकाने ईमेलवरुन पाठविला होता. शुक्रवारी (२० मार्च) बाँम्बस्फोट होणार असल्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. घटनास्थळी त्वरीत बाँम्बशोधक नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पारपत्र कार्यालयाची तपासणी करण्यात आली. तेव्हा बाँम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. या घटनेमुळे तासभर पारपत्र कार्यालयातील कामकाज विस्कळीत झाले. सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत. आठवड्यापूर्वी पारपत्र कार्यालायत बाँम्ब ठेवल्याची धमकी देणारा संदेश पाठविण्यात आला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×